अमेरिकेतील एका सुपरमार्केटमध्ये काम करणाऱ्या एका महिला कामगाराने नकळत अशी चूक केली की तिला लगेच नोकरीवरुन काढून टाकण्यात आले. तिच्या या चुकीमुळे अत्यंत विषारी वायू तयार झाला ज्यामुळे अनेकांचा जिवाला धोका निर्माण झाला. (Mustard Gas in supermarket)

ही घटना अमेरिकेच्या शिकागोमधील आहे. एलाफ एडम ही महिला सुपर मार्केटमध्ये काम करत होती. काम करत असताना महिलेने ब्लीच आणि ऑल पर्पज क्लिनर हे फॅबुलोसोमध्ये एकत्र केले. या मिश्रणातून खुपच विषारी गॅस तयार झाला. हा गॅस इतका विषारी होता की यामुळे इतरांच्या जिवाला धोका निर्माण झाला.

महिलेच्या अशा अघोरी कृतीमुळे तिला नोकरीवरुन तात्काळ काढून टाकले. याबाबत महिला म्हणाली की, मला या मिश्रणातून असे काही होईल याची कल्पना नव्हती. मला वाटले की कोणतेही पदार्थ आपण मिक्स करु शकतो.

महिलेच्या या मिश्रणातून मस्टर्ड गॅस हा विषारी वायू तयार झाला होता. हा गॅस इतका विषारी असतो की यामुळे त्वचा जळते, फुफ्फुसही खराब होतात. इतकेच नाही तर बराच वेळ श्वासामार्गे वायू शरिरात गेल्याने मृत्यू होतो.

पहिल्या महायुद्धात झाला या गॅसचा वापर

पहिल्या महायुद्धात मस्टर्ड गॅसचा वापर करण्यात आला होता, ज्यामुळे सुमारे 1.2 लाख लोकांचा मृत्यू झाला होता. हिस्ट्री चॅनलच्या वृत्तानुसार, या वायूचा वापर सर्वप्रथम जर्मन सैन्याने महायुद्धात केला होता.

हे पण वाचा

सिनेमातील अदा पाहुन येडा झाला भारतीय क्रिकेटर, अखेर वर्ल्डकप जिंकताच अभिनेत्रीने केला मेसेज
हाँगकाँगमध्ये घडला श्रद्धा वालकर सारखा हत्याकांड, मॉडेलचे केले तुकडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *