इथिओपियामध्ये राहणारे सुरमा जमातीचे लोक जिवंत पाळीव प्राण्याचे रक्त पितात. या जमातीचे लोक चांगले योद्धे मानले जातात. रक्त पिल्याने त्यांची शक्ती वाढते आणि ते अधिक ताकदवान बनतात असा या लोकांना विश्वास आहे.
सुरमा लोक प्राण्यांचे रक्त पिण्यासाठी दोन पद्धती वापरतात. हे लोक एका टोकदार बाणाने प्राण्याच्या मानेला छेद करतात आणि रक्त एका विशेष भांड्यात गोळा करतात आणि पितात. किंवा ते थेट प्राण्याच्या मानेला छिद्र पाडतात आणि त्यात तोंड घालून रक्त प्यायला लागतात.
या लोकांना फक्त दूध प्यायला आवडते. पण महिन्यातून एकदा ते रक्त पितात. याशिवाय खाद्यपदार्थांची कमतरता निर्माण झाल्यावरही ते प्राण्यांचे रक्त पिऊन जगतात.
दरम्यान, सुरमा लोकांप्रमाणेच दक्षिण केनिया आणि आफ्रिकेच्या उत्तर टांझानियामध्ये राहणारे मसाई जमातीचे लोकही प्राण्यांचे रक्त पिऊन जगतात. सुरमा आणि मसाई लोकांच्या परंपरा खूप समान आहेत.