महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात जन्मलेल्या कल्पना सरोज (Kalpana Saroj) यांचा जीवनप्रवास हा थक्क करणारा आहे. दलित समाजात जन्मलेल्या कल्पना यांनी मुंबई येऊन 2 रुपयांपासून सुरुवात करत आज 2000 कोटींचे साम्राज्य (Business Empire) उभे केले आहे.

कल्पना यांनी आपल्या एका मुलाखतीत सांगितले की, “वयाच्या 12व्या वर्षी घरच्यांनी लग्न लावून दिले. दलित असल्यामुळे घरात शिक्षणाबाबत उदासीनता होती. सासरी देखील गुरासारखे घरकाम करून घेतले जात असे. एकेदिवशी वडिलांनी माझी अवस्था पाहिली आणि मला परत गावी आणले.”

कल्पना यांनी सासर सोडून गावाला आल्यावर नवी सुरुवात केली. 16 व्या वर्षी कल्पना या आपल्या काकांकडे मुंबईला आल्या. शिवणकाम येत असल्याने त्यांनी कापड गिरणीत काम करण्यास सुरुवात केली.

सुरुवातीला कल्पना यांना दिवसाला 2 रुपये म्हणजेच महिन्याला 60 रुपये पगार मिळत असे. या मिलमध्येच काम करताना कल्पना यांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा झाली.

कल्पना यांनी अनुसूचित जातीच्या लोकांना मिळणाऱ्या कर्जातून शिलाई मशीन आणि इतर काही वस्तू खरेदी केल्या आणि बुटीकचे दुकान उघडले. कल्पना यांनी वयाच्या 22व्या वर्षी फर्निचरचा व्यवसाय सुरू केला.

पुढे जाऊन कल्पना यांनी काही कामगारांना हाताशी धरून 17 वर्ष बंद पडलेली कमानी ट्युब्स कंपनी चालवायला घेतली. याच कंपनीची सध्याची उलाढाल 500 कोटीहून अधिक आहे.

कल्पना यांनी बांधकाम क्षेत्रातही आपले योगदान दिले. तसेच अनेक अशिक्षित बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी अनेक उपक्रम राबवले. कल्पना यांच्या याच थक्क करणाऱ्या जीवनप्रवासाची दखल घेत भारत सरकराने 2013मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन सन्मानित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *