10 मिनिटात 3 क्वार्टर प्यायल्याने उत्तरप्रदेशातील जय सिंह नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, जय सिंह याने आपल्या मित्रांसोबत एक पैज लावली. यामध्ये 10 मिनिटात 3 क्वार्टर पिणे अनिवार्य होते.
पैज लावल्याप्रमाणे जय सिंह याने 10 मिनिटात 3 क्वार्टर प्यायल्या. मात्र पुढच्या काही मिनिटातच जय सिंहची प्रकृती इतकी खालावली की तो बेशुद्ध पडला. जवळच्या नातेवाइकांनी त्याला रुग्णालयात नेले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी जय सिंहचे मित्र भोला आणि केशव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नातेवाईकांनी तक्रार दाखल करताना सांगितले की, जय सिंह कडे 60 हजार रुपये होते, तेही गायब करण्यात आले आहेत.