सलील पारेख हे जगातील सर्वात प्रसिद्ध माहिती तंत्रज्ञान (IT) हॉन्चोपैकी एक आहेत. ते भारतातील चार मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि व्यवस्थापकीय संचालक (MD) आहेत.
भारतीय उद्योग महासंघाच्या राष्ट्रीय परिषदेचे सदस्य असलेल्या पारेख यांना आयटी सेवा उद्योगाचा तीन दशकांहून अधिक अनुभव आहे. त्यामुळे ते एखाद्या IT कंपनीची दिशा ठरवण्यासाठी भारतातील सर्वात योग्य व्यक्ती आहेत.
याला म्हणतात भारतीय डोकं! रशियाकडून घेतलं आणि अमेरिकेला विकलं
सलील पारेख यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बॉम्बे येथून एरोनॉटिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतलेले आहे. त्यानंतर पारेख यांनी जागतिक कॉर्पोरेट क्षेत्रात अनेक उच्च पदांवर काम केले आहे. ते कॅपेग्मिनीच्या बोर्डावर होते, जिथे त्यांनी अॅप्लिकेशन सर्व्हिस, क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिस आणि कंपनीचा तंत्रज्ञान विभाग सांभाळला.
IT क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव असलेले सलील पारेख हे जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सीईओंपैकी एक आहेत. 2022 मध्ये इन्फोसिसने त्यांच्या पगारात तब्बल 88 टक्क्यांनी वाढ केली होती.
PHOTO: घरात फर्निचर बनवताय ? इथे पाहा नविन डिजाईन्स आणि वास्तु टिप्स
सध्या पारेख यांचे वार्षिक वेतन 79.75 कोटी रुपये इतके आहे. यापैकी 11 कोटी रुपये त्यांचे निश्चित वेतन आहे. तर सुमारे 68 कोटी रुपये त्यांना इंसेंटीव्ह म्हणून मिळतात. याचाच अर्थ पारेख यांना दररोज 21 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे मिळतात.