आपल्यापैकी अनेकजण सकाळी नाश्त्याला ब्रेड खाणे पसंद करतात. मात्र तुम्ही खात असलेसा ब्रेड भेसळयुक्त असू शकतो. एका व्हायरल व्हिडीओमधुन ही बाब समोर आली आहे.
या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, दोन लोक एका दुकानात जुन्या आणि शिळ्या ब्रेडवर पेंट फवारताना दिसत आहेत. या पेंटमुळे ब्रेड ताजे दिसत आहे. अगदी काही पैशांसाठी लोक असे घाणेरडे कृत्य करत आहेत.
अशा प्रकारच्या ब्रेडचे सेवन केल्यामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुम्हीदेखील ब्रेड खात असाल तर ब्रेड खरेदी करताना सावधानता बाळगण्याची गरज आहे.
दरम्यान, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून लोक व्हिडीओ पाहून भडकले आहेत. काही पैशांसाठी असे कृत्य करणे योग्य नसल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.