गुजरातमधील एका लग्नात चक्क पैशांचा पाऊस पडला आहे. सोशल मिडीयावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये दिसत आहे की, लग्नसोहळा सुरु असताना इमारतीच्या गच्चीवरून वऱ्हाडींवर नोटांचा वर्षाव केला जात आहे.

गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील एका माजी सरपंचाच्या भाच्याच्या लग्नातील हा व्हिडीओ असल्याचे समोर आले आहे. लग्नात १०० आणि ५०० रुपयांच्या नोटांची उधळण केल्याचे पाहून नेटकरीही अवाक झाले आहेत.

हवेत उधळलेले हे पैसे गोळा करण्यासाठी लोकांनी तुफान गर्दी केल्याचे व्हिडीओत दिसत आहे. दरम्यान, याआधी गुजरातमध्ये सांस्कृतीक कार्यक्रमातही असेच पैसे उधळल्याचे अनेक व्हिडीओतून समोर आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *