सोशल मीडियावर सतत विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक अतरंगी व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एका मॉडेलने कपड्यांना आग लावून कॅट वॉक केल्याचे दिसत आहे.
हा व्हिडिओ पॅरिस फॅशन वीकच्या हेलियट एमिलच्या फॉल/विंटर 2023 शोमधील असल्याची माहिती समोर आली आहे. कपड्यांना आग लावून कॅट वॉक करणाऱ्या मॉडेलने हुड असलेले जॅकेट, झिपर अॅक्सेंट असलेली फ्लेर्ड पॅंट, शूज, एक लहान बॉक्स बॅग असा पोषाख परिधान केला होता.
अद्भुत आहे या माणसाच्या पोटाची रचना, संपुर्ण विमान खाल्ले तरी पचले
हा कॅट वॉक सुरू असताना मॉडेलने स्वताःचा चेहरा झाकला होता. तसेच हा कार्यक्रम सुरू असताना शो चे कर्मचारी बाजूला अग्निशामक सुविधांसह तत्पर उभे होते अशी माहितीही समोर आली आहे.
दरम्यान, हा व्हिडिओ पाहुन अनेकांनी मजेशीर कॉमेंट्स केल्या आहेत. तुम्ही जेव्हा भांडण जिंकून बाहेर पडता पण तुमचा पारा तापलेला असतो तेव्हा अशी स्थिती होते असे असे एका युजरने म्हटला आहे.
या अभिनेत्याने पत्नीचा नको तो Video केला शेअर