फ्रान्सच्या मिशेल लोटीटो (Michel Lotito) या माणसाने आपल्या अद्भुत पराक्रमाने विज्ञानाला चक्रावून सोडले आहे. मिशेल यांनी आपले संपुर्ण आयुष्य धातू खाण्यात खर्ची केले आहे. त्यांच्या याच पराक्रमाची दखल गिनीज बुक ऑफ रेकॉर्डनेही घेतली आहे.
मिशेल यांनी वयाच्या ९व्या वर्षापासून धातू खाण्यास सुरुवात केली. त्यानंतर १६ व्या वर्षापासून त्यांनी आपले हे असामान्यत्व समाजात दाखवण्यास सुरुवात केली. सुरूवातीला लोकांना हा एक ड्रामा वाटत असे. मात्र कालांतराने हा माणूस असामान्य आहे हे लोकांना पटू लागले.
मिशेल यांनी आपल्या संपुर्ण कारकीर्दीत १८ सायकल्स, १५ सुपरमार्केट ट्रॉली, २ बेड्स, ७ टीव्ही सेट, ५०० मीटरची स्टील चैन, १ संपुर्ण विमान खाल्ले आहे. मिशेल यांना सेसना 150 या मॉडेलचे संपुर्ण विमान खाण्यास २ वर्ष लागले होते.
मिशेल हे धातू खाण्याआधी त्याचे छोटे तुकडे करुन घेतात. त्यानंतर ते पाण्याच्या घोटासोबत धातू गिळतात. विशेष म्हणजे मिशेल हे धारदार वस्तुही अगदी सहजतेने खातात.
जेव्हा डॉक्टरांनी मिशेल यांच्या शरीररचनेचा अभ्यास केला तेव्हा असे दिसून आले की, त्यांच्या पोटाची रचना सामान्य माणसापेक्षा खुपच मजबुत आहे. त्यामुळे मिशेल यांच्या शरीरात प्रमाणापेक्षा जास्त अॅसिडची निर्मीती होते. याच अॅसिडमुळे धातू पचवण्यास मदत होते. मिशेल हे दिवसाला ९०० ग्रॅम धातू सहज पचवू शकतात. त्यामुळे मिशेल यांच्या शरिरावर धातूचा काहीच परिणाम होत नाही.
आश्चर्याची बाब म्हणजे धातू पचवणाऱ्या मिशेल यांना सामान्य माणसाचे अन्न पचवण्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. १९९७मध्ये मिशेल यांनी धातू खाण्याचे सोडून दिले त्यानंतर काही महिन्यातच त्यांचा मृत्यु झाला.