भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारीचे पत्नीसोबतचे रोमँटीक फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. मनोज तिवारी हा बंगाल रणजी संघाचा कर्णधार आणि बंगालचा क्रीडामंत्री देखील आहे.
मनोज तिवारीची पत्नी सुष्मिता राॅय इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असते. अलीकडेच तिने स्वतःचे सुंदर आणि बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर लाईक्स आणी काॅमेंट्सचा पाऊस पडत आहे.
मनोज आणि सुष्मिताची भेट सर्वप्रथम 2007 मध्ये झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. कालांतराने या प्रेमाचे रूपांतर प्रेमात झाले. 7 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2013 मध्ये या दोघांनी लग्न केले.
सुष्मिता ही सतत मनोजच्या पाठीशी उभी राहिली आहे. एका व्यक्तीने मनोज तिवारीचे नाव ऑल टाइम फ्लॉप आयपीएल इलेव्हनमध्ये टाकले होते. त्यावेळी सुष्मिता चांगलीच संतापली होती आणि तिने संबंधीत युजरला खडसावले होते.