Tandoori Chicken: कुकरमध्ये तुम्ही घरच्या घरी चिकन तंदुरी बनवू शकता. यासाठी तुम्हाला पुढील काही स्टेप्स फॉलो करायला लागतील.

सुरूवातीला चिकन मॅरीनेट करुन घ्या.

चिकन मॅरीनेट करण्यासाठी लागणारे साहित्य :- चिकन, दही, लिंबाचा रस, गरम मसाला, लाल मिरची पावडर, हळद, आदरक लसून पेस्ट, धने पावडर, जिरे पावडर, काळ्या मिरचीची पावडर, मीठ
(आम्ही इथे चिकनचे प्रमाण ५०० ते ६०० ग्रॅम घेतले आहे.)

मॅरीनेशनची कृती – चिकन मॅरीनेशन करताना सर्वात आधी चिकनला आदरक लसून पेस्ट लावा. त्यानंतर हळद, धने पावडर, जिरे पावडर, काळ्या मिरचीची पावडर, लाल मिरची पावडर, गरम मसाला, काळ्या मिरचीची पावडर, मीठ, लिंबाचा रस, बेसन पीठ आणि योग्य प्रमाणात दही घ्या. त्यानंतर हे सर्व मिश्रण चिकनला चोळून घ्या.

Make tandoori chicken in a pressure cooker

मिश्रण व्यवस्थित चोळल्यानंतर चिकन २ तासासाठी सेट होण्यासाठी बाजूला ठेवा.

चिकन मॅरीनेट झाल्यानंतर एक कुकर घ्या. यामध्ये तेल टाका. त्यानंतर ३ टोमॅटोची प्युरी टाका. त्यामध्ये मीठ टाका, काश्मिरी मिरची पावडर टाका, हे सर्व परतून घ्या. टोमॅटोची प्युरी व्यवस्थित शिजवून घ्या. हे मिश्रण व्यवस्थित परतून घेतल्यानंतर कुकरचे झाकन लावून २ ते ३ मिनिटे शिजवून घ्या. मिश्रणाने तेल सोडले की टोमॅटो प्युरी व्यवस्थित शिजली आहे, असे समजा.

शिजलेल्या टोमॅटो प्युरीमध्ये मॅरीनेट केलेले चिकन टाका. थोडावेळ हे चिकन परतून घ्या. बेसन खाली चिटकू नये म्हणून थोडे पाणी टाका. त्यानंतर कुकरचे झाकण लावून चिकन शिजवून घ्या. २ शिट्या झाल्यानंतर गॅस बंद करा. कुकर थंड झाला की चिकन एका प्लेटमध्ये काढून घ्या.

चिकन प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर कुकरमध्ये उरलेली ग्रेवीही एका वाटीत काढून घ्या. या ग्रेवीचा उपयोग चिकन तंदुरीची चटणी म्हणून करता येऊ शकतो.

चिकन प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर ते सुकन्यासाठी ठेवा. ५ ते १० मिनीटात चिकनवर असलेला मसाला सुकून जाईल.

चिकन सुकल्यानंतर गॅसच्या फ्लेमवर चिकन भाजून घ्या. चिकन भाजून घेताना त्यावर बटर लावा. सर्व बाजुने भाजून घेण्यासाठी चिकन पीस उलटापालटे करत रहा. चिकनवर काळे डाग येण्यास सुरूवात झाल्यास चिकन भाजले असल्याचे समजा.

चिकन पुर्णपणे भाजून झाल्यानंतर ते सर्व्ह करा.

या रेसिपीचा व्हिडीओ तुम्ही bharatzkitchen या यु ट्युब चॅनेलवर पाहू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *