भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची प्रेमकहाणी मोठी रंजक आहे. विशेष म्हणजे इंदिरा गांधी यांच्या निवडीला स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देखील विरोध केला होता.
ही घटना त्यावेळची आहे जेव्हा फिरोज हे महाविद्यालयात शिकत होते आणि ते भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले होते. त्याचवेळी इंदिरा गांधी यांच्या आई कमला नेहरू या कॉलेजसमोर आंदोलन करत असताना बेशुद्ध पडल्या. त्यावेळी फिरोज यांनी त्यांची काळजी तर घेतलीच, पण आनंद भवनात (नेहरू कुटुंबाच्या घरी) जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूसही सुरू केली. त्याचवेळी इंदिरा आणि फिरोज यांची भेट झाली.
कालांतराने फिरोज यांनी नेहरू कुटुंबीयांच्या घरी जाण्यास सुरुवात केली. हळूहळू फिरोज आणि इंदिरा यांच्यात जवळीकता वाढत गेली. मात्र या प्रेमकहाणीत पंडित जवाहरलाल नेहरू थोडेसे व्हिलन ठरले. ज्यावेळी इंदिरा गांधी प्रेमात पडल्या. तेव्हा त्यांचे वय 16 होते. तर फिरोज यांचे वय 21 होते.
इंदिरा आणि फिरोज यांच्यात वयाचे अंतर जास्त होते. याशिवाय त्यांचा धर्मही वेगळा होता. इंदिरा या हिंदू तर फिरोज हे पारसी होते. असे असतानाच फिरोज आणि जवाहरलाल नेहरू यांच्यात वैचारिक मतभेदही होते. त्यामुळे नेहरू हे या विवाहाला मान्य करण्यास राजी नव्हते.
इंदिरा आणि फिरोज यांच्या प्रेमाच्या चर्चा सर्वत्र होऊ लगल्या. यावर नेहरू खूपच नाराज झाले. त्यांनी यावर महात्मा गांधींजीकडे सल्ला मागितला. गांधीजी यांनी स्वतःचे ‘गांधी’ हे आडनाव फिरोज यांना दिले. पुढे जाऊन 26 मार्च 1942 मध्ये हिंदू रितीरिवाजाप्रमाणे इंदिरा आणि फिरोज यांचे लग्न झाले.