घर बांधताना ज्याप्रमाणे वास्तुशास्त्राची मदत घेतली जाते त्याचप्रमाणे घरातील फर्निचर बनवतानाही वास्तुशास्त्राचा विचार जरुर करावा.
जर तुमचे फर्निचर वास्तुशास्त्राला धरुन नसेल तर त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर, कुटुंबावर आणि आर्थिक प्रगतीवर होऊ शकतो.
घरातील फर्निचर वास्तुशास्त्राला धरुन असेल तर घर कायम ऊर्जावान राहते. वास्तुशास्त्रात ऊर्जेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे.
घरातील हॉल हा कायम मोकळा असावा. विनाकारण जास्त फर्निचर केल्याने आणि अडगळ केल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
हॉल हा प्रकाशमान आणि हवेशीर असावा. हॉलच्या पुर्व किंवा पश्चिम भिंतीला एक फॅमिली फोटो जरुर लावावा. परंतु त्यामध्ये मृत व्यक्तीचा फोटो नसावा.
(लक्षात ठेवा : घरातील फर्निचरसाठी कधीही सागवान किंवा शिसमाच्या लाकडाचा वापर करावा)
घरातील उत्तर किंवा पुर्व दिशेला जड फर्निचर करु नये. या दिशेला हलके फर्निचर असावे. जर तुम्हाला जड फर्निचर करायचे असेल तर ते दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला करावे.
जेवणाचा टेबल गोल, अंडाकृती, किंवा षटकोनी असु नये. ते चौकोनी किंवा आयताकृती असावे.
बेडरुममध्ये पलंग हा दक्षिणेला डोके होईल असा असावा. पुर्व किंवा पश्चिम असला तरी चालतो. पण उत्तरेला डोके करुन झोपू नये.
बेडरुममध्ये पलंगासमोर आरसा लावू नये. बेडरुममध्ये करण्यात येणारे फर्निचर वूडन रंगाचे असावे.
किचन मधील किचन ट्रॉली काळ्या रंगाची नसावी.
नैऋत्य दिशेच्या कोपऱ्यात उत्तरेला तोंड करुन पैशांचे कपाट असावे. यामध्ये तुम्ही तुमचे दागिणे ठेऊ शकता.
देवघर हे ईशान्य कोपऱ्यात असावे.
जर तुम्हाला वर दिलेल्या माहितीप्रमाणे आणि डिजाईन्सप्रमाणे फर्निचर करायचे असेल तर तुम्ही महालक्ष्मी प्लाय आणि हार्डवेअर यांच्याशी संपर्क साधू शकता.
महालक्ष्मी प्लाय आणि हार्डवेअर हे पुणे, पिंपरी-चिंचवड, मंबई, बारामती, इंदापुर, भिगवण, सातारा अशा अनेक शहरात फर्निचर आणि इंटेरिअरची कामे करतात. यांची खासियत अशी की हे अगदी किफायतशीर दरात काम करतात.
महालक्ष्मी प्लाय आणि हार्डवेअर संपर्क क्रमांक :- +91 9623 771 771 (विश्वजित बोबडे)
हे पण वाचा
– VIDEO : शेतकऱ्यांचे कष्ट कमी होणार, आता यंत्राद्वारे कांदा काटता येणार
– या जमातीत प्राण्यांचे रक्त पिणे आहे शौर्याचे लक्षण !