‘टाटा नमक’ म्हणजेच टाटा मीठ हा देशातील नंबर वन ब्रँड आहे. मात्र हा ब्रँड अल्पावधीत प्रसिद्ध होण्यासाठी अनेक युक्त्यांचा वापर करण्यात आला.
टाटाने मार्केटचा अभ्यास केला तेव्हा असे लक्षात आले की, भारतात सुरुवातीला मिठाचा कोणताच ब्रँड नव्हता. तसेच कोणतेच मीठ हे पॅकेटमध्ये विकले जात नव्हते. जे मीठ स्वस्त असायचे त्यालाच ग्राहक प्राधान्य द्यायचे.
1983ला टाटाने मिठाच्या व्यवसायात उडी मारली आणि पहिले बंद पॅकेटमधील मीठ बाजारात आणले. टाटाने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मिठाच्या किंमतीत एकही रुपया कमी केला नाही. याउलट याला आरोग्याशी जोडले.
टाटाने आपल्या ब्रँडला प्रमोट करताना हे आरोग्यदायी तसेच लोहयुक्त असल्याचे सांगितले. मिठात टाटाने आयोडीन घातले. ज्यामुळे अनेक आजारांवर हे मीठ उपयुक्त असल्याचे सांगितले.
पुढे जाऊन टाटाने ‘देश’ हा शब्द आपला ब्रँड प्रमोट करण्यासाठी वापरला.
जसे की,
– टाटा नमक देश का नमक
– देश कि सेहत देश का नमक
– देश के रग रग मे आयर्न
– सवाल देश की सेहत का
अशा काही टॅग लाईन्समुळे टाटाचे मीठ हे देशात अल्पावधीत प्रसिद्ध झाले.
आज भारतातील अनेक घरात टाटा मिठाला प्राधान्य दिले जाते. सध्याच्या घडीला भारत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील ऑपरेशन्ससह टाटा मिठाची एकूण वार्षिक उलाढाल 12,400 कोटींची आहे.