बरेच लोक शनि देवांना तेल वाहतात. मात्र यामागचे शास्त्रीय कारण खूप कमी लोकांना माहिती आहे.
पौराणिक कथेनुसार, हनुमानाला शनिची महादशा सुरू होणार होती. त्यावेळी शनि देवांनी हनुमानाला महादशेची पुर्वकल्पना दिली. याकाळात रामसेतू बांधायचे काम चालू होते आणि याची पुर्ण जबाबदारी प्रभू श्री रामांनी हनुमानावर दिली होती. त्यामुळे हनुमान शनि देवांना म्हणाले की, महादशेसारख्या प्रकृतीच्या नियमांना मी विरोध करु इच्छीत नाही. पण माझ्यासाठी सध्या रामसेवा महत्त्वाची आहे. रामसेवा पुर्ण होताच मी माझे शरिर तुम्हाला अर्पण करतो.
हनुमानाच्या या विनंतीला शनि देवांनी मान्यता दिली नाही. ते अदृश्य होऊन हनुमानाच्या शरिरावर आरुढ झाले. शनि देव शरिरावर आरुढ होताच हनुमानाने पर्वताला धडका घेण्यास सुरुवात केली. यामुळे शनिदेव घायाळ झाले. अखेर शनिदेवांनी हनुमानाची क्षमा मागितली.
हनुमानाच्या या रुद्र आवतारामुळे शनिदेवांना अनेक ठिकाणी जखमा झाल्या होत्या. या जखमांवर हनुमानाने तिळाचे तेल लावले. त्यामुळे शनि देवांना तिळाचे तेल वाहिले जाते. तसेच जे लोक हनुमानाची भक्ति करतात अशांना शनि देव त्रास देत नाहीत.
लोखंड आणि तेल
शनि देवांचे शस्त्र हे लोखंडाचे आहे. त्यामुळेही शनि देवांना तेल अर्पण केले जाते. कारण तेल आणि लोखंड हे मित्र मानले जातात. (लक्षात ठेवा: शनि देवांना फक्त तिळाचेच तेल अर्पण करावे.) तेल अर्पण केल्याने शनि देवांची वक्र दृष्टी कमी होते. तसेच घरात सुख शांती नांदते. त्वचाविकारही बरे होतात.