भारताचा माजी क्रिकेटर हरभजन सिंगची लव्ह स्टोरी मोठी रंजक आहे. 2007चा टी20 वर्ल्डकप हा भज्जीसाठी टर्निंग पॉईंट ठरला.

हरभजन सिंग हा 2006 साली लंडनहुन भारतात आलेल्या बॉलिवूड अभिनेत्रीवर फिदा झाला होता. या अभिनेत्रीचे नाव होते गीता बसरा.

गीता बसरा ही आपले करिअर करण्यासाठी लंडनहून भारतात आली होती. तिला बॉलिवूडच्या द ट्रेन या सिनेमात संधीही मिळाली. या सिनेमात इम्रान हाशमीसोबत गीताने काम केले होते. याच सिनेमातील एक गाणे हरभजनने पाहिले आणि त्यातील गीताच्या अदा पाहून भज्जी घायाळ झाला. हरभजन सिंगने अनेक खटपटी करुन अभिनेत्री गीता बसराचा फोन नंबर मिळवत कॉल करुन तिला कॉफीसाठी विचारले.

गीताला हरभजन बाबत काहीच माहिती नव्हते. तो एक क्रिकेटर आहे हे देखील गीताला माहिती नव्हते. एका मुलाखतीत हरभजनने सांगितले की, “जेव्हा मी गीताला क्रिकेटबद्दल विचारले तेव्हा तिला या खेळाबद्दल काहीच माहिती नव्हते. तिच्या घरातही कोणी क्रिकेट पाहत नव्हते. त्यामुळे तिच्यासाठी हरभजन सिंग हा पुर्णपणे अनोळखी होता.”

2007 मध्ये भारताने टी20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर गीताने स्वत: हून हरभजन सिंगला अभिनंदनाच मेसेज केला आणि कॉफीसाठी विचारले. पुढे जाऊन हरभजन आणि गीताचे नाते आणखी खुलत गेले.

हरभजन सिंग गीताला भेटता यावे यासाठी अनेक खटपटी करत असे. त्याने एकदा गीताला IPLचे पास दिले होते. मात्र अभिनेत्रीने ते पास तिच्या मित्रांना दिले. यावेळीही भज्जीची गीताशी भेट झाली नाही. अखेर 29 ऑक्टोबर 2015 रोजी हरभजन आणि गीता विवाहाबंधनात अडकले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *