रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे अमेरिका आणि युरोपियन युनियनने रशियाकडुन कच्चे तेल खरेदी करणे बंद केले आहे. त्यामुळे युरोपमध्ये आणि अमेरिकेत तेलाची कमतरता निर्माण झाली आहे.

या पार्श्वभुमीवर भारताने मोठी खेळी खेळली आहे. भारत सध्या रशियाकडून कमी किंमतात कच्चे तेल खरेदी करत आहे. हे तेल रिफाईन करून भारत सरकार अमेरिका आणि युरोपला विकत असून यातून मोठा नफा कमवत आहे.

बालाश्रम (पाळणाघर) ते वृद्धाश्रम, समाजाचे डोळे उघडणारी कथा

भारताने जानेवारी 2023 मध्ये अमेरिकेला दररोज सरासरी 89,000 बॅरल डिझेल आणि इतर तेल विकले. तर यूरोपला जानेवारी 2023 मध्ये दररोज सरासरी 1,72,000 बॅरल तेल विकले.

याद्वारे भारत अमेरिका आणि युरोपियन युनियनची तेलाची गरज पुर्ण करत आहे, तसेच वाईट काळात रशियन अर्थव्यवस्थेलाही चालना देण्याचे काम करत आहे. यामुळे जगभरात भारताची प्रतिमा उंचावली जात आहे.

PHOTO: घरात फर्निचर बनवताय ? इथे पाहा नविन डिजाईन्स आणि वास्तु टिप्स

भारताचा हा व्यापार योग्य आहे का ?

युरोपियन युनियनच्या नियमानुसार, रशियाचे कच्चे तेल दुसऱ्या देशात रिफाईन झाल्यास ते युरोपियन युनियनमध्ये विकले जाऊ शकते. त्यामुळे भारताचा हा व्यापार नियमाला धरुन आहे.

दरम्यान, अमेरिकेने भारतावर रशियाकडून तेल खरेदी न करण्यासाठी दबाव टाकला होता. मात्र भारत जवळपास 85 टक्के कच्चे तेल आयात करत असल्यामुळे भारताने अमेरिकेचा विरोध झुगारून तेलाची खरेदी सुरूच ठेवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *