हाँगकाँगमध्ये एका मॉडेलची हत्या करुन तिचे तुकडे केल्याची घटना समोर आली आहे. या मॉडेलचे नाव एबी चोई असे आहे.
एबी चोई ही अनेक दिवस बेपत्ता होती. ती नेमकी कुठे आहे ? याची कोणालाच कल्पना नव्हती. मात्र जेव्हा पोलिसांना हाँगकाँगच्या ताई पो गावात एका फ्रीजमध्ये महिलेचे कापलेले पाय सापडले तेव्हा हे शरिराचे तुकडे मॉडेल एबी चोईचे असल्याचे समोर आले.
आतापर्यंत एबी चोईचे केवळ पायाचे तुकडे सापडले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एबी चोईची हत्या ही तिच्याच सासरच्यांनी केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे. हत्येमागचे कारणही पोलिसांनी यावेळी सांगितले.
एबी चोईने नवऱ्यापासून घटस्फोट घेतला होता. तिचे आणि सासरच्यांचे प्रॉपर्टीवरुन वाद सुरू होते. या कारणावरुनच एबी चोईची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलिस तपासात फ्रीजमध्ये एबी चोईचे पाय सापडले आहेत. तर सुप बनवण्याच्या भांड्यातही शरिराचे काही तुकडे सापडले आहेत. अजूनही पोलिस मॉडलचे शिर, हाथ आणि शरिराचे इतर भाग शोधत आहेत.
ज्या फ्रीजमध्ये मॉडलचे पाय सापडले तिथेच मटण कापण्याचा ग्रांइडर आणि हातमोजेही सापडले. यावरुन असे सांगितले जात आहे की, मॉडलच्या शरिराचे तुकडे ग्रांइडरने केले आहेत.
हे पण माहिती असू द्या
दिल्लीमध्ये श्रद्धा वालकर या तरुणीची तिच्या बॉयफ्रेंडने अशीच हत्या केली होती. अफताब असे बॉयफ्रेंडचे नाव होते. त्याने श्रद्धाची हत्या करुन तिच्या शरिराचे ३६ तुकडे केले होते. हे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले होते.
हे पण वाचा
– याला म्हणतात भारतीय डोकं! रशियाकडून घेतलं आणि अमेरिकेला विकलं
– PHOTO: घरात फर्निचर बनवताय ? इथे पाहा नविन डिजाईन्स आणि वास्तु टिप्स