बॉलिवूडने अनेक स्ट्रगलर्सला मोठे केले आहे. यामध्ये असे अनेक कलाकार होते ज्यांना अभिनयाचा अनुभवही नव्हता. मात्र केवळ एक संधी मिळाल्याने या कलाकारांचे आयुष्य बदलून गेले.
तुम्हाला अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री माधुरी दिक्षित यांचा ‘दिल’ सिनेमा आठवतो का ? या सिनेमात आमिर खानला धडा शिकवण्यासाठी माधुरी दिक्षित आपला बॉक्सर मित्र आदि इराणी सोबत आमिर खानची लढत लावते. ही लढत जो हारेल त्याला मिस मिली ही भारी भक्कम शरिर असणारी मुलगी किस करणार असते. आज आपण याच मिस मिली बद्दल जाणून घेणार आहोत.
दिग्दर्शक इंद्र कुमार यांना ‘दिल’ या सिनसाठी अशाच एका मुलीची गरज होती. इंद्र कुमार हे मुंबईतील वांद्रे येथून जात असताना त्यांना रस्त्याच्या कडेला भीक मागत असलेली एक लठ्ठ मुलगी दिसली. जेव्हा इंद्र कुमार यांनी या मुलीला पाहिले तेव्हा त्यांना वाटले की, मिस मिलीची भूमिका साकारणारी योग्य मुलगी सापडली आहे.
सिनेमातील कलाकार आदि इराणी यांनी या मुलीबद्दल बोलताना म्हटले की, या मुलीने अनेक दिवस अंघोळ केली नव्हती. तसेच तिची अवस्था खुपच भीषण होती. मात्र त्या एका सिनसाठी इंद्र कुमार यांनी या मुलीला संधी दिली. पुढे जाऊन इंद्र कुमार यांनी या मुलीला ‘बेटा’ सिनेमात रोल दिला. या मुलीने अनेक सिनेमात काम केले.
या मिस मिलीचा म्हणजेच या मुलीचा शेवट खुपच शेवट खुपच वाईट झाला. ही तरुणी मुंबईतील खार ते सांताक्रूझ सिग्नलपर्यंत भीक मागायची. तिचा कार अपघातात मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती, पण आदि इराणी यांनी काही वेगळेच उघड केले. त्यांनी सांगितले की, ‘त्या मुलीने ट्रक ड्रायव्हरशी लग्न केले होते, पण सतत खालावलेल्या प्रकृतीमुळे तिचा मृत्यू झाला.’
हे पण वाचा
– सिनेमातील अदा पाहुन येडा झाला भारतीय क्रिकेटर, अखेर वर्ल्डकप जिंकताच अभिनेत्रीने केला मेसेज
– हाँगकाँगमध्ये घडला श्रद्धा वालकर सारखा हत्याकांड, मॉडेलचे केले तुकडे