बरेच डॉक्टर आहारात राईस ब्रान ऑईलचा (Rice Bran Oil) समावेश करण्याचा सल्ला देतात. मात्र अजूनही बहुसंख्य लोकांना राईस ब्रान ऑईल म्हणजे काय हे माहिती नसल्याचे दिसून येते. सध्या भारतासह जपान, चीन अशा अनेक देशात राईस ब्रान ऑईल खाल्ले जाते.

कशापासून बनते राईस ब्रान ऑईल ?

राईस ब्रान ऑईल हे तांदळाच्या कोंड्यापासून बनवले जाते. मिलमध्ये तांदळाच्या वरचा थर वेगळा केल्यानंतर जो काही कोंडा उरतो त्यापासूनच तेल काढले जाते. काही भागात या कोंड्याला तांदळाची साळ देखील म्हणतात.

तांदळाला अनेक थर असतात, त्यापैकी एकाला ‘चोकर’ म्हणतात. तांदळाच्या कोंडामधला हा तपकिरी कडक आणि तेलकट थर असतो.

राईस ब्रान ऑईल का खावे ? (Rice Bran Oil benefits)

राईस ब्रान ऑईल प्रामुख्याने खाण्यायोग्य आहे कारण ते चिकट नसते. याशिवाय यामध्ये आढळणाऱ्या चरबीचे संतुलित प्रमाण आपले हृदय निरोगी बनवते. राईस ब्रान ऑईल ओरिझानॉलचा उत्कृष्ट स्त्रोत आहे.

एका अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, या तेलातील अँटीऑक्सिडंट हृदयरोग कमी करण्यास मदत करते. हे तेल अतिशय चविष्ट असते आणि त्याचे धुरा होण्याचे प्रमाणही कमी असते. याचा अर्थ, उच्च तापमानातही तेल आपले पोषण टिकवून ठेवते.

– राईस ब्रान ऑईल कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त ठरते

राईस ब्रान ऑईलमध्ये सर्व वनस्पती तेलांपेक्षा मोनोअनसॅच्युरेटेड, पॉलीअनसॅच्युरेटेड आणि सॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण सर्वाधिक असते. फॅटी ऍसिडचे हे संतुलन म्हणजे ते आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. याशिवाय, एथेरोस्क्लेरोसिस आणि त्याच्याशी संबंधित समस्या जसे की हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक सारख्या परिस्थितीची शक्यता कमी करण्यासाठी राईस ब्रान ऑईल सर्वात योग्य असल्याचे मानले जाते.

– राईस ब्रान ऑईल हे व्हिटॅमिन ई आणि इतर महत्त्वाच्या पोषक तत्वांचा चांगला स्रोत आहे.
– राईस ब्रान ऑईल रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास आणि इंसुलिन प्रतिरोधक क्षमता सुधारण्यास मदत करू शकते. (यावर आणखी अभ्यास सुरू आहे.)
– राईस ब्रान ऑईल मधील संयुगे कर्करोगापासून संरक्षण करू शकतात, परंतु आणखी संशोधन आवश्यक आहे.

– राइस ब्रान ऑइल हायपोअलर्जेनिक आहे. राईस ब्रान ऑईल शरीराच्या ऍलर्जीक प्रतिसादाची यंत्रणा शांत करण्यास मदत करते.
– राइस ब्रान ऑइल हायपोथायरॉईडीझम असलेल्या लोकांमध्ये थायरॉईड उत्तेजक संप्रेरक (TSH) पातळी कमी करते. त्याचा थेट परिणाम हायपोथालेमसवर होतो. जर तुम्ही हायपोथायरॉईडीझमने ग्रस्त असाल, तर तांदळाच्या कोंडाचे तेल वापरणे तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते.

– अभ्यास दर्शवितात की राइस ब्रान ऑइल श्वासाच्या दुर्गंधीशी लढा देऊ शकते, तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकते आणि त्वचेचे आरोग्य वाढवू शकते.


कुठे मिळेल राईस ब्रान ऑईल ?

सध्याच्या घडीला बरेच लोक राईस ब्रान ऑईलला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे शहरी भागातील अनेक किराणा दुकानात हे तेल उपलब्ध आहे. जर तुमच्या परिसरात सुपर मार्केट असेल तर या ठिकाणी हे तेल सहज मिळू शकते. या तेलाची किंमत १५० ते २०० रुपयांपर्यंत असू शकते. (तेलाची किंमत ही बाजारभावानुसार बदलत असते.)

कोणत्या कंपनीचे राईस ब्रान ऑईल घ्यावे ?

बाजारात अनेक नामवंत कंपन्यांचे राईस ब्रान ऑईल उपलब्ध आहे. त्यापैकी तुलसी कंपनीचे (Tulsi Rice bran Oil) फिजीकल रिफाईंड राईस ब्रान ऑईल मिळाल्यास ते घ्यावे.

यशोगाथा: गेली १० वर्ष विकतायत राईस ब्रान ऑईल

पुण्याजवळील सासवड शहरात राजेंद्र निंबाळकर हे गेली १० वर्ष राईस ब्रान ऑईलची विक्री करत आहेत. जेव्हा राईस ब्रान ऑईलचा कुठेही गाजावाजा नव्हता अशावेळी राजेंद्र निंबाळकर यांनी ओम ऑईल डेपो या नावाने शॉप सुरू करून राईस ब्रान ऑईलच्या विक्रीला सुरूवात केली.

राजेंद्र निंबाळकर सांगतात की, सुरूवातीला लोकांना राईस ब्रान ऑईल म्हणजे काय ? हे समजावून सांगावे लागत होते. मात्र कालांतराने लोकांना महत्त्व पटल्यानंतर समोरुन तेलाची मागणी वाढू लागली. सुरूवातीला अतिशय कमी प्रमाणात तेलाची विक्री होत असे. मात्र आता सुर्यफुल आणि सोयाबीन तेल खाणारी मंडळी राईस ब्रान ऑईल खाण्यास प्राधान्य देत आहेत. यामध्ये अनेक डायबेटीस आणि हार्ट पेशंट देखील आहेत.

हे पण वाचा
नविन सोफा घेताय ? Limes Wood इथे बनवून मिळतात आकर्षक सोफे, पाहा लेटेस्ट डिजाईन्स
हा भारतीय माणूस दिवसाला घेतो 21 लाख पगार
PHOTO: घरात फर्निचर बनवताय ? इथे पाहा नविन डिजाईन्स आणि वास्तु टिप्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *