ब्रिटनमधील एक व्यक्ती फक्त हवा विकून करोडपती बनला आहे. लिओ दी वॅट असे या व्यक्तीचे नाव आहे. तो Aethaer नावाच्या कंपनीचा मालक आहे.
Aethaer ही कंपनी ब्रिटनमधील फ्रेश हवा जारमध्ये बंद करते आणि ऑनलाईन विकते. ज्या लोकांना ताज्या ऑक्सिजनची गरज आहे किंवा ज्या लोकांना श्वसनाचा आजार आहे असे लोक ही हवा खरेदी करतात.
या व्यवसायाच्या माध्यमातुन लिओ दी वॅटने आतापर्यंत 46 कोटींची कमाई केली आहे. या अनोख्या बिझनेस आयडियाचे अनेक लोकांनी कौतुक केले आहे.