भारतात 67,368 किलोमीटरपेक्षा जास्त लांब रेल्वे मार्ग आहे. हा मार्ग सतत वाढत आहे. या मार्गावरून दररोज लाखो लोक प्रवास करतात. त्यामुळे भारतीय रेल्वे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे.
भारतीय रेल्वेबद्दल अशा अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. आज आपण देशातील अशा एका ठिकाणाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, जिथे एक नाही तर दोन रेल्वे स्टेशन आहेत.
महत्त्वकांक्षी हुकूमशहा ! तहानलेल्या देशासाठी तयार केली २८२० किमीची मानवनिर्मीत नदी
महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर आणि बेलापूर रेल्वे स्थानके एकाच ठिकाणी आहेत. या दोन रेल्वे स्थानकांमधला फरक एवढाच आहे की एक रेल्वे स्टेशन रुळाच्या उजव्या बाजूला आहे आणि दुसरे रेल्वे स्टेशन रुळाच्या डाव्या बाजूला आहे.
काही गाड्या श्रीरामपूर रेल्वे स्थानकावर येतात तर काही गाड्या बेलापूरला येतात आणि येथून सुटतात. त्यामुळे आपली गाडी नेमकी कुठल्या स्थानकावर येणार आहे हे जाणून घेण्यासाठी प्रवाशांना रेल्वे कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी लागते.
कपड्यांना आग लावून मॉडेलने केला कॅट वॉक, Video व्हायरल